तुजविण काही । स्थिर
3146.
तुजविण काही । स्थिर राहे ऐसे नाही ॥१॥
कळो आले बहुता रीती । पांडुरंगा माझ्या चित्ती ॥धृपद॥
मोकलोनी आस । सर्वभावे झालो दास ॥२॥
तुका म्हणे तूचि खरा । येर वाउगा पसारा ॥३॥
अर्थ :
हे पाडूरंगा तुझ्यावाचून या त्रिभुवनामध्ये काही टिकेल असे दुसरे नाही. हे माझ्या चित्ताला विविध प्रकारच्या अनुभवाने कळून आले आहे. देवा मी सर्व प्रकारच्या इच्छा आशा अपेक्षा आस यांचा त्याग करुन सर्वभावे तुझा दास झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा सर्वांमध्ये तूच एक खरा आहेस बाकी सर्व व्यर्थ पसारा आहे.
