वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

कामांमध्ये काम । काह

🙏 3. संत तुकाराम · ABH-080659 · अभंग क्र. ३११५

3115.
कामांमध्ये काम । काही म्हणा रामराम । जाइल भवश्रम । सुख होईल दुःखाचे ॥१॥
कळो येईल अंतकाळी । प्राणप्रयाणाचे वेळी । राहाती निराळी । रांडापोरे सकळ ॥धृपद॥
जीता जीसी जैसा तैसा । पुढे आहे रे वोळसा । उगवुनि फासा । काय करणे ते करी ॥२॥
केले होते याचि जन्मे । अवघे विठोबाच्या नामे । तुका म्हणे वर्मे । जाणोनिया तरती ॥३॥

अर्थ :
तुम्हाला खूप काम आहेत परंतु त्याला कामांमध्ये आणखी एक काम करा ते म्हणजे मुखाने रामराम असे म्हणत रहा. त्यामुळे होईल काय तर या भावसागरातील सर्व श्रम तुमचे निघून जातील आणि जो दुःखरूप असा संसार आहे तो सुखरूप होईल. तुम्हाला तुमच्या अंतकाळी हे कळून येईल की, तुमच्या पासून तुमची बायको पोरे मुलेबाळे ही सर्व वेगळी उभे राहिले आहेत. अरे तू जोपर्यंत जगशील तोपर्यंत कसाबसा तरी जगशील परंतु तुला पुढे अनेक जन्ममरणाचे भवरे आहेत. त्यामुळे तू प्रथम सर्व बंधनाचे पाश तोडून टाक मग तुला काय करायचे ते कर. तुकाराम महाराज म्हणतात अरे तू याच जन्मात विठोबाचे नाम घेऊन काही सत्कर्म केले तर तुला पुढे चांगले फल प्राप्त होईल. हेच खरे परमार्थातील मर्म जे जाणून घेतील तेच या भवसागरातून तरतील.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग