वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

खोंकरी आधन होय पाकसि

🙏 3. संत तुकाराम · ABH-080456 · अभंग क्र. ३१४७

3147.
खोंकरी आधन होय पाकसिद्धी । हे तो घडो कधी शकेचि ना ॥१॥
खापराचे अंगी घासिता परिस । न पालटे कीस काढिलिया ॥२॥
पालथे घागरी रिचविता जळ । तुका म्हणे खळ तैसे कथे ॥३॥

अर्थ :
खापराच्या फुटक्या मडक्यामध्ये पाण्याला आधन येईल किंवा पूर्ण स्वयंपाक त्याच्यामध्ये होईल असे कधीही घडू शकणार नाही. खापराच्या अंगावर कितीही वेळा परीस घासला आणि शेवटी त्या खापराचा कीस काढून पाहिला तर त्यामध्ये काहीही बदल झालेला दिसणार नाही त्याचे सोने झालेले आपणास दिसणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, पालथ्या घागरीवर आपण कितीही पाणी टाकले तरी ती घागर कधीही भरणार नाही त्याप्रमाणे दुष्ट मनुष्य कितीही हरीकथेमध्ये येऊन बसला तरी त्याच्या चित्तामध्ये काहीच बदल होणार नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग