अवघा वाया संसार । अव
3159.
अवघा वाया संसार । अवघा सार विठ्ठल ॥१॥
अवघे आले वाया जाती । फजिती हे समजेना ॥२॥
अवघे नरदेहीं चोर । अवघा सार विठ्ठल ॥३॥
अवघे वाया जाते जन्म । अवघे कर्म चुकेना ॥४॥
अवघ लटिका साच नव्हे । अवघा वाया जात असे ॥५॥
अवघा जनीं भरला । एका जनार्दनी उरला ॥६॥
