वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

कोण आमची योगतपे । कर

🙏 3. संत तुकाराम · ABH-080488 · अभंग क्र. ३१३३

3133.
कोण आमची योगतपे । करू बापे जाणावी ॥१॥
गीत संतसंगे गाऊ । उभी ठाऊ जागरणी ॥धृपद॥
आमुचा तो नव्हे लाग । करू त्याग जावया ॥२॥
तुका म्हणे इंद्रियांसी । येचि रसी रंगवू ॥३॥

अर्थ :
योग तपे करण्याचे जाणतात असे कोण आमचे बाप आहेत ? संतांच्या संगतीत आम्ही हरीनामाचे गीत गाऊ आणि हरी किर्तनाच्या जागरणामध्ये आम्ही उभे राहू. सर्व गोष्टीचा त्याग करुन निघून जावे एवढे आमच्याच्याने शक्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आमच्या इंद्रियांना हरीनाम गीत गाणे तसेच हरी किर्तनामध्ये उभे राहाणे या रंगामध्येच रंगून टाकू.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग