काय उणे मज पांडुरंगा
3160.
काय उणे मज पांडुरंगा पायी । रिद्धिसिद्धी ठायी वोळगती ॥१॥
कोण पाहे सुखा नासिवंताकडे । तृष्णेचे बापुडे नहो आम्ही ॥धृपद॥
स्वर्गसुखे आम्ही केली पावटणी । पापपुण्ये दोन्ही उलंडिली ॥२॥
तुका म्हणे घरी आणिले वैकुंठ । वसविली पेठ वैष्णवांची ॥३॥
अर्थ :
अहो मी पाडूरंगाच्या पायाजवळ गेलो तर मला काय कमीपणा आहे त्या पाडूरंगाच्या पायाजवळ तर रिध्दी सिध्दी देखील दासी होऊन त्याची सेवा करत आहेत. अहो एवढे मोठे सुख सोडून नाशवंत सुखाकडे कोण पाहतोय तृष्णेने आम्ही गरीब झालेलो नाहीत. अहो आम्ही या सुखापुढे सर्व सुखाची पावटणी केली आहे पाप आणि पुण्य हे तर केव्हाच आम्ही उडवून दिले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठच आमच्या घरी आणले आहे आणि वैष्णवांची बाजारपेठच येथे वसवली आहे.
