नामाचा उच्चार करिता
3136.
नामाचा उच्चार करिता कोण्ही हांसे । तयासी होतसे नरकवास ॥१॥
साबडे बोबडे गावोत भलते । परि ते सरते पांडुरंगा ॥२॥
अभाविकनें मांडिला पसारा । तया नाही थारा उभयलोकीं ॥३॥
एकाजनार्दनी भावाचें भजन । दंभाचे कारण नाही देवा ॥४॥