वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

अर्भकाचे साठी । पंते

🙏 3. संत तुकाराम · ABH-080834 · अभंग क्र. ३१६१

3161.
अर्भकाचे साठी । पंते हाती धरिली पाटी ॥१॥
तैसे संत जगी । क्रिया करुनी दाविती अंगी ॥धृपद॥
बालकाचे चाली । माता जाणुनि पाउल घाली ॥२॥
तुका म्हणे नांव । जनासाठी उदकी ठाव ॥३॥

अर्थ :
लहान मुलांना शिकवण्यासाठी पंतोजी आपल्या हातात पाटी धरत असतात. त्याप्रमाणे संत देखील आहेत ते मुक्त आहेत परंतू सामान्य लोक मुक्त व्हावे या करता जगामध्ये वावरतात आणि चांगले कर्म करुन दाखवतात. लहान बाळकाचे हळूहळू पावल टाकणे पाहून त्याच्या चालीनुसारच आई पाऊल टाकते. तुकाराम महाराज म्हणतात, लोकांना पाण्यातून तरुन जाण्याकरताच नांव पाण्यामध्ये राहात असते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग