वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

झंविली महारे । त्याच

🙏 3. संत तुकाराम · ABH-080546 · अभंग क्र. ३१२७

3127.
झंविली महारे । त्याची व्याली असे पोरे ॥१॥
करी संताचा मत्सर । कोपे उभारोनि कर ॥धृपद॥
बीज तैसे फळ । वरी आले अमंगळ ॥२॥
तुका म्हणे ठावे । ऐसे झाले अनुभवे ॥३॥

अर्थ :
महार व्यक्ती ज्या स्त्रीशी संबंध करतो तीच स्त्री अशा वाईट मुलांना जन्म देते. की जी पोरे संतांचा मत्सर करतात आणि दोन्ही हात वर करुन रागावून त्यांना मारण्यास सावध होतात. अमंगळ प्रकारचे बीज जर असेल तर वरती फळ देखील अमंगळ प्रकारचेच येते. तुकाराम महाराज म्हणतात, हे मला अनुभवानेच माहित झाले आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग