वेद अनंत बोलिला । अर
3153.
वेद अनंत बोलिला । अर्थ इतुलाचि शोधिला ॥१॥
विठोबासी शरण जावे । निजनिष्ठा नाम गावे ॥धृपद॥
सकळशास्त्रांचा विचार । अंती इतुलाचि निर्धार ॥२॥
अठरापुराणी सिद्धांत । तुका म्हणे हाचि हेत ॥३॥
अर्थ :
वेद अनंत विषया विषयी बोलला आहे परंतू शेवटी अर्थ एवढाच सांगितला आहे, की विठोबाला शरण जावे आणि एकनिष्ठेने, एकतत्वाने त्याचे नाम घ्यावे. सर्व शास्त्रांचा विचार करुन शेवटी एवढाच निर्धार केलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आणि विठोबाला शरण जावे हाच सिध्दांत अठरा पुराणांनी देखील सांगितलेला आहे.
