वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

आड पडे काडी । तरि ते

🙏 3. संत तुकाराम · ABH-080615 · अभंग क्र. ३१४१

3141.
आड पडे काडी । तरि ते बहुत पाणी खोडी ॥१॥
ऐशी दुर्जनसंगती । बहुतांचे घात होती ॥धृपद॥
एक पडे मासी । तरी ते बहु अन्न नासी ॥२॥
तुका म्हणे रांड । ऐसी का ते व्याली भांड ॥३॥

अर्थ :
ज्याच्या मुखामध्ये विठोबाचे नाम निरंतर आहे त्याचे मुख जरी पाहिजे तरी पतित मनुष्य तरुन जातात. विठ्ठल विठ्ठल असे भक्तीभावपूर्वक जो आपल्या वाचेने म्हणेल तो काळाचे देखील दात नक्कीच ठेचील. अहो या विठोबाने अशा कित्येक पतित भक्तांचा उध्दार केला आहे केवळ त्या भक्तांनी नाम घेतले म्हणून. या त्रिभुवनामध्ये विठोबावाचून दुसरा उदार दाता कोणीही नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी या विठोबाची आणि त्याच्या नामाची किर्ती यापूर्वी खूप ऐकली आहे त्यामुळेच तर मी एकातात जाऊन त्या विठोबाला व त्याच्या नामाला माझ्या ह्दयामध्ये धारण केले आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग