वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

झाली हरीकथा रंग वोरस

🙏 3. संत तुकाराम · ABH-080444 · अभंग क्र. ३१५५

3155.
झाली हरीकथा रंग वोरसला । उचितासी आला पांडुरंग ॥१॥
वाटितो हे प्रेम उचिताचा दाता । घेई रे तू आता धणीवरी ॥धृपद॥
प्रेम देऊनिया अवघी सुखी केली । जे होती रंगली विठ्ठली ती ॥२॥
तुके हे दुर्बळ देखियले संती । म्हणउनि पुढती आणियेले ॥३॥

अर्थ :
संतांनी हरीकथा केली कथेचा रंग ओसरला आणि उचित दान देण्याकरता पाडूरंग तेथे आला. पाडूरंग दाता प्रेमाचे उचित दान सर्वांना वाटत आहे त्यामुळे तुम्ही तुमची तृप्ती होईपर्यंत पाडूरंगाचे प्रेमाचे दान घ्यावे. जी जी भक्त हरीकथेमध्ये अगदी रंगून गेले होते त्यांना सर्वांना विठ्ठलाने त्याचे प्रेमाचे दान देऊन सुखी केले. तुकाराम महाराज म्हणतात, मी दुर्बळ आहे मी तर सर्व संतांच्या मागे होतो त्यामुळे संतांनी ओळखले की मला पाडूरंगाचा प्रसाद मिळाला नाही त्यामुळे त्यांनी मला हाताला धरुन पाडूरंगापुढे आणले व देवाचा प्रसाद मला प्राप्त करुन दिला.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग