वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

सेट्या ना चौधरी । पा

🙏 3. संत तुकाराम · ABH-080713 · अभंग क्र. ३१२४

3124.
सेट्या ना चौधरी । पाडेपण वाहे शिरी ॥१॥
जकातीचा धंदा । तेथे पाप वसे सदा ॥२॥
गाई म्हैसी हेड । तुप विकी महा द्वाड ॥३॥
तुका म्हणे पाही । तेथे पुण्या रीघ नाही ॥४॥

अर्थ :
जो मनुष्य नर शेटही नसतो आणि नेमलेला चौधरीही नसतो परंतू विनाकारणच गावचा कारभार आपल्या माथ्यावर घेऊन फिरतो तो मूर्खच आहे असे समजावे. ज्याचा धंदा जकातीचा म्हणजे कर वसुलीचा आहे त्याच्या जवळ अखंड पापच रहात असते. जो व्यापारी गाई म्हशीचे खिलार त्याप्रमाणे त्यांचे तूप विकतो तो वाईट आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी वर ज्या गोष्टी सांगितल्या तेथे कधीही पुण्याला प्रवेश मिळणार नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग