सुख एक आहे हरि आठवित
3143.
सुख एक आहे हरि आठविता । इतर जपतां दुःख बहु ॥१॥
ऐशी आठवण धरूनि मानसी । हरि गावा मुखासी दिननिशी ॥२॥
सारे दिन करा संसाराचा हेत । परी भजनीं प्रीत असों द्यावी ॥३॥
एका जनार्दनी धरूनि विश्वास । होई का रे दास संतचरणी ॥४॥