घ्यावया वोखदाची वाटी
3141.
घ्यावया वोखदाची वाटी । माता साखर दे चिमुटी ॥१॥
तेणेंक घोटी गोडपणें । हारे व्याधी नाना पेणे ॥२॥
तयासाठीं घाबरी । माता होय ती निर्धारी ॥३॥
शरण एका जनार्दनी । तैसा लोभ ठेवा मनी ॥४॥