वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 113. संसार - अभंग ३०८३ ते ३१७७

येवोनिया काळ बैसलासे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085309 · अभंग क्र. ३१२१

3121.
येवोनिया काळ बैसलासे उसां । झाकितोसी कैसा डोळे आता ॥१॥
वाचे नारायण वदे तू सादर । काळपाश साचार चुके जेणे ॥२॥
वाया हा संसार करसी हावभरी । काळाची तो फेरी निकट आली ॥३॥
एका जनार्दनी नको यातायाती । संसार फजिती जन्म दुःख ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग