वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

कुंकवाची ठेवाठेवी ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-080853 · अभंग क्र. ३१३१

3131.
कुंकवाची ठेवाठेवी । बोडकादेवी काशाला ॥१॥
दिवस गमा भरा पोट । का गे नेटनेटावा ॥धृपद॥
दिमाख हा कोणा दावा । लटकी जीवा चरफड ॥२॥
तुका म्हणे झोंडगी हो । फुंदा का हो कोरडी ॥३॥

अर्थ :
कुंकवाची उठाठेव बोडक्या देवीला म्हणजे विधवा स्त्रीला कशासाठी पाहिजे ? आता कसेतरी पोट भरुन दिवस काढा उगाच का नटासारखे नटता. अहो हा दिमाख तुम्हाला कोणाला दाखवायचा आहे जीवाची व्यर्थ चडफड तुम्ही का करुन घेता ? तुकाराम महाराज म्हणतात, अहो झोंड बायांनो उगाचच हा कोरडा नखरा का करतात ?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग