पंढरीचे भूत मोठे । आ
3142.
पंढरीचे भूत मोठे । आल्या गेल्या झडपी वाटे ॥१॥
बहु खेचरीचे रान । जाता वेडे होय मन ॥धृपद॥
तेथे जाऊ नका कोणी । गेले नाही आले परतोनि ॥२॥
तुका पंढरीसी गेला । पुन्हा जन्मा नाही आला ॥३॥
अर्थ :
पंढरीचे भूत फार मोठे आहे वाटेने येणाऱ्या जाणाऱ्याला ते तेव्हाच झपाटून टाकते. पंढरी क्षेत्रातील रान हे खूप खेचरीचे आहे तेथे जे कोणी येतात जातात त्यांचे मन वेडे होऊन जाते. त्यामुळे तेथे कोणी जाऊ नका आणि जे पंढरीला गेलेत ते संसारात पुन्हा कधीही परतून मागे आलेच नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, मी देखील पंढरीला गेलो आणि पुन्हा जन्मालाच आलो नाही.
