सारासार विचार करा उठ
3162.
सारासार विचार करा उठाउठी । नाम धरा कंठी विठोबाचे ॥१॥
तयाच्या चिंतने निरसले संकट । तराल दुर्घट भवसिंधु ॥धृपद॥
जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम । धरी हाचि नेम अहर्निशी ॥२॥
तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत । भावे गाता गीत विठोबाचे ॥३॥
अर्थ :
जगामध्ये सार काय असार काय याचा विचार करा आणि लवकरात लवकर विठोबाचे नाम कंठात धारण करा. त्याच्या चिंतनाने म्हणजेच विठोबाच्या सतत चिंतनानेच तुमचे सर्व संकट दूर होतील नाहीसे होतील आणि दुर्गट असा भवसिंधू तुम्ही सहज तरुन जाल. अहो तुम्ही मनुष्य देहाच्या उत्तम कुळात जन्माला आला आहात तर रामाचे नामस्मरण तुम्ही तुमच्या वाचेने नित्य करत राहा आणि हाच नित्य नियम तुम्ही रात्रंदिवस धरा व त्याचे पालन करा. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही जर भक्तीभावपूर्वक विठोबाचे गुणगान गायीले तर कोटीकुळे पुनीत म्हणजे पवित्र होतात.
