वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

संतचिन्हे लेउनि अंगी

🙏 3. संत तुकाराम · ABH-080826 · अभंग क्र. ३१५०

3150.
संतचिन्हे लेउनि अंगी । भूषण मिरविती जगी ॥१॥
पडिले दुःखाचे सागरी । वहावले ते भवपुरी ॥धृपद॥
कामक्रोधलोभ चित्ती । वरीवरी दाविती विरक्ती ॥२॥
आशापाशी बांधोनि चित्त । म्हणती झालो आम्ही मुक्त ॥३॥
त्यांचे लागले संगती । झाली त्यासी तेचि गति ॥४॥
तुका म्हणे शब्दज्ञाने । जग नाडियेले तेणे ॥५॥

अर्थ :
जे लोक संत चिन्हे म्हणजे बाह्य रंगाने वरवर माळ मुद्रा टिळे भगवे वस्त्र अंगावर घेऊन मिरवत असतात, असे लोक दु:खाच्या सागरामध्ये पडलेले असून भवनदीच्या महापूरामध्ये वाहून गेलेले आहेत. त्याच्या चित्तामध्ये काम क्रोध लोभ हे विकार असतात परंतू वरवर लोकांना आम्हाला वैराग्य झाले आहेत असे दाखवतात. यांचे चित्त खरे तर आशापाशाने बांधलेले असतात परंतू हे लोकांना सांगतात की आता आम्ही मुक्त झालो आहोत. आणि ज्या लोकांना या ढोंगी लोकांची संगती लाभते, त्या लोकांना देखील या ढोंगी लोकाप्रमाणेच अधोगती प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात, केवळ वरवर असणाऱ्या शब्दज्ञानाने या ढोंगी लोकांनी इतर लोकांना फसवलेले असते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग