चोर्यांयशी लक्ष देह
3129.
चोर्यांयशी लक्ष देहाप्रती । कोटी कोटी फेरे होती ॥१॥
अवचट देह मनुष्य जन्म । तेथे साधावें परब्रह्मा ॥२॥
जन्मोनिया मनुष्यदेहीं । परमार्थ साधिला तो नाही ॥३॥
सदा विषयी अनुसंधान । भुले प्रपंचीं अनुदिन ॥४॥
तया नोहे संतभेटी । एकाजनार्दनी जाता भेटी ॥५॥
