वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

उदंड पाहिले उदंड ऐकि

🙏 3. संत तुकाराम · ABH-080881 · अभंग क्र. ३१३५

3135.
उदंड पाहिले उदंड ऐकिले । उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे ॥१॥
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर । ऐसा विटे वरी देव कोठे ॥धृपद॥
ऐसे संतजण ऐसे हरीदास । ऐसा नाम घोष सांगा कोठे ॥२॥
तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे । पंढरी निर्माण केली देवे ॥३॥

अर्थ :
अहो आम्ही खूप क्षेत्र पाहिले खूप क्षेत्रांच्या महिमेचे वर्णन देखील ऐकलेले आहे, परंतु अशी चंद्रभागा असे भीमा तीर आणि असा विटेवर उभा असलेला देव कोठे आहे? असे संतजन असे हरिदास आणि असा नाम घोष कोठे आहे ते सांगा? तुकाराम महाराज म्हणतात आम्हा अनाथांसाठी देवाने पंढरी हे क्षेत्र निर्माण केले आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग