लाभ पुढे करी । घात न
3145.
लाभ पुढे करी । घात नारायण वारी ॥१॥
ऐसी भक्ताची माउली । करी कृपेची साउली ॥धृपद॥
माय बाळकासी । जीव भाव वेची तैसी ॥२॥
तुका म्हणे नाड । नाही शरणागता आड ॥३॥
अर्थ :
अहो हा नारायण आपल्या भक्तांच्या पुढे लाभ करतो आणि त्या भक्तांवर येणारे घातपात तो स्वत: निवारण करतो. अशी ही भक्तांची माऊली आहे ती नेहमी तिच्या भक्तांवर कृपेची सावली करत असते. अहो ज्याप्रमाणे आई आपल्या मुलासाठी आपला जीवभाव देखील समर्पन करण्यास तयार असते अगदी त्याप्रमाणेच हा नारायण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जे नारायणाला एकनिष्ठतेने शरण जातात त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही व त्यांची कोणतीही इच्छा अपूर्ण राहात नाही.
