क्षमाशस्त्र जया नराच
3113.
क्षमाशस्त्र जया नराचिया हाती । दुष्ट तयाप्रति काय करी ॥१॥
तृण नाही तेथे पडिला दावाग्नि । जाय तो विझोनि आपसया ॥२॥
तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित । धरा अखंडित सुखरूप ॥३॥
अर्थ :
क्षमा हे शस्त्र ज्या मनुष्याच्या हातात आहे त्याला दुष्ट मनुष्य काय करीन ? ज्या ठिकाणी गवत नाही तेथे अग्नी जरी पडला तरी तो अग्नी आपोआप विझून जातो. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वांचे व स्वत:चेही हित क्षमा करते त्यामुळे सुखाचे जे कारण ते म्हणजे क्षमा आहे ती अखंडित तुमच्याजवळ राहू दयावे.
