देह अशाश्वत नाम हे श
3155.
देह अशाश्वत नाम हे शाश्वत । म्हणोनि विवादत श्रुति शास्त्रे ॥१॥
नाशिवंतासाठीं राननाम तुटी । ससाराची आटी करिती जन ॥२॥
जडत्व पाषाण नामेंचि तरले । अभेदें भरले देह ज्याचे ॥३॥
शुद्धभाव पोटी वासना निर्मळ । संकल्प बरळ नव जाती ॥४॥
एका जनार्दनी दृढ हा निश्चय । राम सखा होय तयालागीं ॥५॥
