वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 113. संसार - अभंग ३०८३ ते ३१७७

मंत्रामाजीं मंत्र वि

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085327 · अभंग क्र. ३१३९

3139.
मंत्रामाजीं मंत्र विठ्ठल त्रिअक्षरी । जपतां निर्धारी सुख होय ॥१॥
म्हणोनिया करा लागपाठ बळे । संसारी अंधळे होऊं नका ॥२॥
संसारसागर भरला दुस्तर । विठ्ठल पैलपार नौका जगी ॥३॥
तापत्रयें तापली भवार्णवीं पीडिली । तया विठ्ठलवली प्रकाशली ॥४॥
जाणिवेचे डोहीं नको पडुं फेरे । विठ्ठल उच्चारें कार्यसिद्धि ॥५॥
एका जनार्दनी विठ्ठलाची आण । दुजा तारी कोण मज सांगा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग