वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

पिंडपोशकाच्या जळो ज्

🙏 3. संत तुकाराम · ABH-080677 · अभंग क्र. ३१४९

3149.
पिंडपोशकाच्या जळो ज्ञानगोष्टी । झणी दृष्टिभेटी न हो त्याची ॥१॥
नाही संतचिन्ह उमटले अंगी । उपदेशालागी पात्र झाला ॥धृपद॥
पोहो नये कासे लावितो आणिका । म्हणावे त्या मूर्खा काय आता ॥२॥
सिणले ते गेले सिणलियापासी । झाली त्या दोघासी एक गति ॥३॥
तुका म्हणे अहो देवा दिनानाथा । दरुषण आता नको त्याचे ॥४॥

अर्थ :
पिंडाचे पोषण करुन ज्ञानाच्या गोष्टी करणाऱ्या लोकांच्या ज्ञानासंबंधीच्या गोष्टीला आग लागो अशा लोकांच्या दृष्टीला चुकून सुध्दा भेट होऊ नये. अशा लोकांच्या अंगामध्ये कोणत्याही प्रकाराने संतांची चिन्हे उमटलेली नसतात परंतू मी इतरांना उपदेश करण्यासाठी पात्र झालो आहे असे ते समजत असतात. अहो या लोकांना कसे पाहावे हे देखील कळत नाही त्यांना नीट पाहाता देखील येत नाही आणि आपल्या स्वत:च्या कासेला दुसऱ्याला धरायला लावतो अशा मूर्खांना आता काय म्हणावे ? अहो एखादा त्रासलेला व्यक्ती दुसऱ्या त्रासलेल्या व्यक्तीचे समाधान करण्यास त्याच्याजवळ गेला तर काय होईल दोघाची गती एकच होणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो देवा दीननाथा मला आता अशा मूर्खांचे दर्शन सुध्दा नको आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग