वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

तिळ एक अर्ध राई । सी

🙏 3. संत तुकाराम · ABH-080670 · अभंग क्र. ३१३९

3139.
तिळ एक अर्ध राई । सीतबिंद पावे काई । तया सुखा नाही । अंतपार पाहता ॥१॥
म्हणउनी करा लाहो । नका मागे पुढे पाहो । अवघ्यामध्ये आहो । अवघे साव चित्त तो ॥धृपद॥
तीर्थे न येती तुळणी । आजिया सुखाची धणी । जे काशी गयेहुनी । जी आगळी असती ॥३॥
येथे धरी लाज । वर्ण अभिमान काज । नाडला सहज । तुका म्हणे तो येथे ॥३॥

अर्थ :
पंढरीत जे सुख आहे त्याच्या तुलनेत एक तिळभर देखील किंवा अर्ध्या राई इतके किंवा पाण्याच्या एका थेंबा एवढे देखील सुख अन्य तीर्थक्षेत्री प्राप्त होत नाही किंबहुना पाहता असे आढळून येते की तेथे मिळणाऱ्या सुखाला काही पारावारच उरत नाही आणि त्या सुखाचा अंत पण मोजता येत नाही. तुम्ही सर्वांनी त्वरा करा आणि काहीही मागचा पुढचा विचार न करता पंढरीला भेट द्या. तेथे सर्व जणांमध्ये तुम्हाला तो सावचित्त म्हणजेच सावळे परब्रम्‍ह प्रत्ययास येईल. अशा या पंढरीची इतर कोणत्याही तीर्थक्षेत्राशी तुलना करता येत नाही मग ते काशी असो किंवा गया किंबहुना पंढरी ही त्यांच्यापेक्षा कितीतरी आगळी वेगळी आणि विलक्षण असून तेथे येणारे सर्व भक्त खऱ्या अर्थाने सुखाचे धनी होतात. तुकाराम महाराज म्हणतात परंतु अशा ठिकाणी जो कोणी वर्ण अभिमान मानून मनात लाज धरेल, संदेह बाळगेल तो सहज नाडला गेलाच म्हंणून समजा, त्याला पूर्णपणे विपरीत अनुभव आलाच म्हणून समजा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग