वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 113. संसार - अभंग ३०८३ ते ३१७७

जिता मायबापा न घालित

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085287 · अभंग क्र. ३१४६

3146.
जिता मायबापा न घालिती अन्न । मेल्या प्रेतावरी करिती पिंडदान ॥१॥
पहा पहा संसारींचा कैसा आचारु । जिता अबोला मा मेल्या उच्चारु ॥२॥
जित्या मायाबापा न करिती नमन । मेल्यामगें करिती मस्तक वपन ॥३॥
जित्या मायबापा धड गोड नाही । श्राद्धीं तळण मळण परवडी पाही ॥४॥
जित्या मायबापा गालीप्रदान । मेल्या त्याचेनी नांवे देती गोदान ॥५॥
जित्या मायबापा नेदी प्याला पाणी । मेल्या पितरांलागी बैसती तर्पणीं ॥६॥
प्याया पाणी न घालिती सासरा जिता । पिंडापाशी येती मग दंडवता ॥७॥
एका जनार्दनी कृपेचे तान्हें । विधिनिषेध दोन्ही आतळो नेदी मने ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग