देहाचिये माथा काळाची
3120.
देहाचिये माथा काळाची तो सत्ता । म्हणोनि सर्वथा घोका राम ॥१॥
आदि मध्य अंतीं काळ लागलाहे । क्षणक्षणां पाहे वास त्यासी ॥२॥
सर्व जाणोनिया अंधळें पै होती । काळ नेतांचि देखतो ते दुजा ॥३॥
परि रामनामी न धरिती विश्वास । निकट समयास धांवाधांवी ॥४॥
एका जनार्दनी भुलले ते प्राणी । तया सोडवाणी कोण करी ॥५॥
