वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

ध्यानी ध्याता पंढरिर

🙏 3. संत तुकाराम · ABH-080591 · अभंग क्र. ३१५७

3157.
ध्यानी ध्याता पंढरिराया । मनासहित पालटे काया ॥१॥
तेथे बोला कैची उरी । माझे मीपण झाला हरी ॥धृपद॥
चित्तचैतन्यी पडता मिठी । दिसे हरीरूप अवघी सृष्टि ॥२॥
तुका म्हणे सांगो काय । एकाएकी वृत्ति हरीमय ॥३॥

अर्थ :
जो पंढरीरायाचे मनामध्ये सतत चिंतन करत असतो त्याचे मन आणि त्याचे शरीर देखील हरीरुप होते असा पालट होतो. मग तेथे बोलण्यास काहीही शिल्लक राहात नाही माझे आणि मीपण हे देखील हरीरुपच होते. चित्ताची आणि चैतन्याची मिठी पडली की सर्व सृष्टी हरीरुपच दिसू लागते. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुम्हाला काय सांगू हरीचे ध्यान सतत केले असता वृत्ती देखील हरीमयच होऊन जाते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग