करणे ते हेचि करा । न
3122.
करणे ते हेचि करा । नरका अघोरा का जाता ॥१॥
जयामध्ये नारायण । शुद्धपण ते एक ॥धृपद॥
शरणागता देव राखे । येरा वाखे विघ्नाचे ॥२॥
तुका म्हणे लीन व्हावे । कळे भावे वर्म हे ॥३॥
अर्थ :
अहो तुम्हाला काही करायचेच असेल तर मी जे सांगतो ते तुम्ही करा उगाचच घोर नरकाला तुम्ही का जाता ? तुम्ही कोणतेही कर्म करा परंतू ते जर नारायणाला उद्देशून तुम्ही केले तर तेच एक शुध्द पुण्य होईल. देव त्याला शरण आलेल्या दासांचे रक्षण करतो इतरांना अनेक विघ्नांना, संकटांना सामोरे जावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात, जर तुम्हाला पुण्य कमवायचेच असेल तर त्यासाठी एक वर्म आहे ते म्हणजे सर्वत्र एक नारायण आहे ही संकल्पना दृढ ठेवावी सर्वांसमोर लीन व्हावे.
