असावे स्वधर्मे जाणाव
354.
असावे स्वधर्मे जाणावे ते वर्म ।
जेणे कर्मब्रह्म हातवसे ॥१॥
तेव्हा ते आतुडे ब्रह्म सर्वगत ।
भूती भगवंत सर्व होये ॥२॥
कर्म आणि ब्रह्म वेगळे न भासे ।
तया कर्म दिसे ब्रह्मरूप ॥३॥
बहेणि म्हणे ब्रह्म बळे भाविता ।
कर्म अधःपाता घालील देखा ॥४॥
