भाव शुद्ध रे शुद्ध र
351.
भाव शुद्ध रे शुद्ध रे बरवा धरावा ।
ब्रह्मनिष्ठ रे निष्ठ रे गुरू तो करावा॥
मायामळ रे मळ रे सांडोनिया द्यावा ।
स्वस्वरूपी रे स्वरूपी रे ध्यास असू द्यावा ॥१॥
ऐक ऐक रे तू मना माजिया जीवना ।
चुकवी चुकवी रे या जना चौर्यांयसी यातना॥
अध ऊर्ध्व हा सौरसु सारी भववेदना ।
म्हणुनि करितसे जोडुनी दोन्ही कर प्रार्थना ॥२॥
सतसंग रे संग रे निःसंग असावा ।
अंतरंग रे रंग रे प्रेमा तो धरावा॥
शांति क्षमेसी क्षमेसी ठाव देही द्यावा ।
विवेक विचार विचार या मनासी करावा ॥३॥
स्थूळ धरावे धरावे क्षेत्र की क्षेत्रज्ञ ।
भावे भजावे भजावे सगुण की निर्गुण॥
निष्ठा रहावे रहावे एकी अनेकजण ।
डोळा पहावे पहावे ब्रह्म परिपूर्ण ॥४॥
ग्रंथ पहावे पहावे गीता की भागवत ।
मार्गधरावे धरावे कर्मब्रह्मनिष्ठायुक्त॥
मने सांडावा सांडावा जाणिवेचा तंत ।
बहेणि म्हणे रे म्हणे बरवा रे ऐसा संतसंग ॥५॥
