त्रिगुण असार निर्गुण
353.
त्रिगुण असार निर्गुण हे सार ।
सारासार विचार हरिपाठ ॥१॥
सगुण निर्गुण गुणांचे अगुण ।
हरिविणे मन व्यर्थ जाय ॥२॥
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार ।
जेथूनी चराचर त्यासी भजे ॥३॥
ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी ।
अनंत जन्मांती पुण्य होय ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
