पर्वताप्रमाणे पातक क
357.
पर्वताप्रमाणे पातक करणे ।
वज्रलेप होणे अभक्तांसी ॥१॥
नाही ज्यासी भक्ति तो पतित अभक्त ।
हरिसी न भजत दैवहत ॥२॥
अनंत वाचाळ बरळती बरळ ।
त्या कैसेनि गोपाळ पावे हरि ॥३॥
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान ।
सर्वांघटी पूर्ण एक नांदे ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
