वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

कर्म-ज्ञान-उपासना कर

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075799 · अभंग क्र. ३५६

356.
कर्म-ज्ञान-उपासना करिती त्रिकांड ।
चालिला प्रचंड भक्तीवरी ॥१॥
ऐसा हा अनुभव जाणते जाणती ।
तया पुनरावृत्ति नाही नाही ॥२॥
भक्ति आणि ज्ञान वैराग्य विज्ञान ।
कर्मब्रह्मपण वेद बोले ॥३॥
ब्रह्मचर्य आणि गार्हस्थ वानप्रथ ।
चौथा तो संन्यास वेदांवरी ॥४॥
गुरू शास्त्र तिसरी आत्मप्रचीती ।
चालिल्या निरूक्ति वेदांमाजी ॥५॥
बहेणि म्हणे जया वेद मान्य जाला ।
ब्रह्मी होऊन ठेला तोचि एक ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग