पंढरिचे अनुष्ठान केल
348.
पंढरिचे अनुष्ठान केले चंद्रे ।
अलंकापुरी इंद्रे तपचर्या ॥१॥
तेथे इंदु निष्कलंक अंगे ।
तेथे आरोग्यभगे सुरेंद्रता ॥२॥
हरिहररुपे पंढरीरावो ।
येथे तिन्ही देवो सिध्दरुपे ॥३॥
निळा म्हणे तेथे भक्ती ।
येथे विरक्ती प्रगटली ॥४॥
