निंबोलिया भरे निंबास
347.
निंबोलिया भरे निंबासी भरल्या ।
सुकाळ जाहला बापयांसी ॥१॥
कावकाव तेणे मदे ओरडती ।
परी ते नेणती चवी कैसी ॥२॥
तैसे नको मना मातो कामभरे ।
हित होय बरे तेचि करी ॥३॥
मुक्ताफळे हंस सेवित पक्षिया ।
हासती ते तया काग कैसे ॥४॥
परी त्याची गोडी नेणती विचार ।
मुखे अविचार भरले फाटा ॥५॥
जो तेथे रातला तो तेथे मातला ।
पूर्ण ब्रह्मकळा-चवी नेणे ॥६॥
विष्ठा पै कस्तुरी केवि ते समान ।
बहेणि म्हणे ज्ञान दुर्लभ हे ॥७॥
