वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

अव्यक्त मसुराकार पूर

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075146 · अभंग क्र. ३५४

354.
अव्यक्त मसुराकार पूर्वार्ध संचले ।
लक्षा सरीसे झाले लक्षासी पै ॥१॥
अव्यक्त देखणे देखण्या आले व्यक्त ।
पाहता व्यक्त अव्यक्त दोन्ही नाही ॥२॥
जागृतीच्या ठायी निजतो सहखदळी ।
बिंदूच्या समेळी उच्चार होतो ॥३॥
ज्ञानदेव शरण निवत्तीच्या शरणा ।
समजुनी खुणा तटस्थ झालो ॥४॥

अर्थ :
आत्मा अव्यक्त आहे. पण योगी लोक अभ्यासाकरिता त्याला अगोदर मसुरेएवढा मानतात व पुढे चित्त स्थिर झाले म्हणजे त्या मसुरेएवढ्या आकाराचाही निश्चय करून, आपण द्रष्टा आहोत असा निश्चय करतात. व्यक्तरूप पहावयाचे असा शब्दप्रयोग करण्यामुळेच त्याला व्यक्तपणा आला. वास्तविक तो व्यक्ताव्यक्त दोन्ही नाही. योगी जागृतीतच सहस्त्रदळ असलेल्या कमलाच्या आतील नीलबिंदुच्या ठिकाणी आपल्या वृत्तीची स्थिरता करतो. व त्या स्थिरतेतही ओंकार उच्चारतो. श्री निवृत्तिनाथांच्या कृपेने योगमार्गातील या सर्व गोष्टीचा अनुभव घेऊन मी 'स्थिर झालो आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग