वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

आकाशाची गुंफा अंत ना

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075156 · अभंग क्र. ३५६

356.
आकाशाची गुंफा अंत नाही जिचा ।
शोध करा तिचा सर्वभावे ॥१॥
अनंत ब्रह्मांडाचा खेळ जिच्या योगे चाले ।
चांग्यासी मीनले तया ठायी ॥२॥
गुंफेच्या आधारे चंद्र सूर्य चालती ।
विश्रांतीसी येती तये जवळी ॥३॥
ज्ञानदेव नयन धरिता समभावे ।
सोहं स्वरूप भावे लाधलेसे ॥४॥

अर्थ :
जिला आकाशांची गुंफा म्हणतात. तसेच जिचा आत्मज्ञाना शिवाय अंत कळत नाही, अशी जी माया तिचा सर्वदृष्टीने शोध करा. जिच्या अधिष्ठानांवर सर्व अनंत ब्रह्माडांचा खेळ चालतो. त्या पदाला चांगले विचारवान पोहोचले. त्या मायेचा आधार जो परमात्मा त्याच्या योगांने चंद्र सुर्य चालतात व तेथेच शेवटी विश्रांती घेतात. सर्वत्र मायेचे अधिष्ठान परमात्माच भरला आहे. अशा तऱ्हेची समदृष्टी मला प्राप्त झाली. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग