ब्रह्मांडाचे भुवनी क
349.
ब्रह्मांडाचे भुवनी कमळ ते सुंदर ।
पाकोळ्या साचार चार तेथे ॥१॥
औट हात स्थूल अंगुष्ट ।
सूक्ष्म पूर्वार्थ कारण जाण रया ॥२॥
महाकारण मसुरामात्र सदोदित ।
ब्रह्मरंध्र साध्यांत वसतसे ॥३॥
चहु शून्यवर्ण देह चार पहा ।
कृष्ण नीळ शोभा् विकासली ॥४॥
ज्ञानदेव म्हणे आता फार म्हणो काय ।
सहस्त्रदळी निश्चय आत्मा असे ॥५॥
अर्थ :
चिदाकाशात ब्रह्मस्वरुप एक सुंदर कमळ आहे. त्याला चार देहरुपी पाकळ्या असुन त्याचे वर्णन कालच्या अभंगात आले आहे. ते महाकारण मसुरा येवढे आहे. आशा रितीने त्या कमळात काळसर निळ्या रंगाची छटा दिसायला लागली म्हणजे चारी देहांचा विसर पडतो मी जास्त काय सांगु त्या कमळात सहस्त्रदळी आत्मा आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
