वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

धन्य धन्य पुंडलिका ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088422 · अभंग क्र. ३४६

346.
धन्य धन्य पुंडलिका ।
केला तरणोपाय लोका ॥१॥
एका दर्शनेंचि उध्दार ।
केले पावन चराचर ॥२॥
चंद्रभागा पंढरपूर ।
भक्त आणि हरीहर ॥३॥
निळा म्हणे सुलभ केले ।
भूमि वैकुंठ आणिले ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग