वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

धन्य त्रिभुवनी वंद्य

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076106 · अभंग क्र. ३४८

348.
धन्य त्रिभुवनी वंद्य पतिव्रता ।
जे आपुल्या निजहिता प्रवर्तली ॥१॥
ऐसियेची भेटी होताचि लवकरी ।
पापाची बोहरी होय तेणे ॥२॥
आपुला स्वपती जिने वोळखिला चित्ती ।
धन्य त्रिजगती त्रिभुवनी ॥३॥
श्रवणी तोचि ऐके मननी तोचि देखे ।
निजध्यासे सुख घेत असे ॥४॥
अणुमात्र वृत्ति नव्हे तिची भिन्न ।
सदा समाधान स्वामिसुखे ॥५॥
दृश्य या त्रिमिरा सारोनिया मागे ।
सदा उभी संगे स्वामीसेजी ॥६॥
स्वामीचे बोलणे खुणाचि जाणणे ।
मौनेचि करणे विहित धर्म ॥७॥
बोलता मौन्य अकारणा शून्य ।
गुण ना निर्गुण वर्ततसे ॥८॥
जे अद्वैतानिराळे ब्रह्मांडावेगळे ।
ते सुखसोहळे भोगीतसे ॥९॥
जीवनाचे जीवन असंगी समाधान ।
त्रिपुटी-विलक्षण नांदतसे ॥१०॥
ज्ञेय-ज्ञप्तिज्ञान राहिले संपोन ।
निजानंदघन होउनी ठेले ॥११॥
होउनी ठेली वृत्ति अवघी पारूषली ।
तेथे कोण बोली बोलू आता ॥१२॥
ऐसी स्थिति जया स्त्री अथवा पुरूष ।
धन्य तेचि देखा पतिव्रता ॥१३॥
बहेणि म्हणे धन्य तेचि जन्मा आली ।
कीर्ती विस्तारली त्रिभुवनी ॥१४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग