विठ्ठलनाम उघडा मंत्र
358.
विठ्ठलनाम उघडा मंत्र सद्भावे जपा ।
जपता जपता हृदयी खंडन होय पापा। । धृ.॥
दीपक देखुनि पतंग आपुले भावे घालि उडी।
लटकिच माया जाईल लया तोडी प्रपंचाची बेडी॥
स्वानंदाचा प्याला प्यालो अमृताची गोडी।
आकार निराकार म्हणुनी ध्यातो स्वरूपा ॥१॥
परापश्यंती मध्यमा वाचा बोलती वैखरी। ।
षट्दळचक्रावरती एक सत्रावी सुंदरी। ।
जीवशिव आत्मा तेथे गुप्त ध्यान करी। ।
जन्मा येऊनी सावध व्हावे होईल गुरूकृपा ॥२॥
खेचरी भूचरी चांचरी अगोचरी अलक्ष मुद्रा लावुनि उन्मानि॥
उगम पिपीलिका मार्ग नामे पाहे धुंडोनी।
सुईचे अग्र अस्मान दरवाजा येणे तेथोनी॥ ।
चोखामेळा दास हरीचा ध्यातो स्वरूपा ॥३॥
