पृथ्वी आप तेज वायू प
358.
पृथ्वी आप तेज वायू पै गगन ।
विस्तार हा जाण वेदान्वये ॥१॥
अणूच्या प्रमाण नाही वेदावीण ।
एवढे ब्रह्म जाण कोठे वसे ॥२॥
एकवीस स्वर्गे दश दिशा पाताळ ।
अवघा भूगोल वेद जाणा ॥३॥
बहेणि म्हणे वेद सर्वांचे हे मूळ ।
स्वरूप केवळ वेद होय ॥४॥
