वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

चहू शून्याआरूते महाश

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075098 · अभंग क्र. ३५२

352.
चहू शून्याआरूते महाशून्यापरूते ।
सर्वासी पहाते तेचि ते गा ॥१॥
दिसे तेही शून्य पहातेंही शून्य ।
देहामाजी निरंतर भिन्न रूप ॥२॥
शून्य निरशून्य दोन्ही हारपली ।
तेथूनि पाहिली निज वस्तु ॥३॥
ध्येय ध्यान ध्याता निरसुनी तिन्ही ।
झालो निरंजनी अतिलीन ॥४॥
ज्ञानदेव म्हणे अनुभवी तो जाणे ।
गुरूमुखे खूण सांगितली ॥५॥

अर्थ :
शुन्य म्हणजे सत्यत्वाने नसलेल्या, जागृत, स्वप्न, सुषुप्ती, व तुरीय अवस्थांच्या अलिकडे ते ब्रह्म आहे. तसेच महाशून्यावस्था जो उन्मनी पलीकडेहि ते आहे. म्हणून त्यास सर्वद्रष्टा म्हणतात. दिसणारे दृश्य ते शुन्य मिथ्या आहे. आणि आत्म्यावर आलेला पाहातेपणा हाही खोटा असे समजावे देहांत राहाणारा आत्मा या देहाहून निराळा आहे. शून्यसहित व शून्यरहित हे दोन्हीही धर्म आत्म्याच्या ठिकाणी नाहीत, असा निजात्मा पहा. त्या आत्म्याच्या ठिकाणी ध्याता ध्येय व ध्यान ही त्रिपुटी नाहीशी होऊन मूळचे जे शुद्धस्वरूप तेथे मी लीन झालो. माऊली ज्ञानदेव सांगतात मला अनुभवाची खूण गुरूमुखाने मला कळली.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग