झाली कीर्तनाची दाटी
357.
झाली कीर्तनाची दाटी ।
चंद्रभागे वाळुवंटी ॥१॥
संत गर्जती आनंदे ।
हरिची नामे नाना छंदे ॥२॥
टाळ मृदंग झणत्कार ।
नामे कोंदले अंबर ॥३॥
निळा म्हणे वैकुंठवासी ।
झाला सुलभ हरिभक्तांसी ॥४॥
357.
झाली कीर्तनाची दाटी ।
चंद्रभागे वाळुवंटी ॥१॥
संत गर्जती आनंदे ।
हरिची नामे नाना छंदे ॥२॥
टाळ मृदंग झणत्कार ।
नामे कोंदले अंबर ॥३॥
निळा म्हणे वैकुंठवासी ।
झाला सुलभ हरिभक्तांसी ॥४॥