वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

सहस्त्रदळ ब्रह्मरंध्

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075116 · अभंग क्र. ३४७

347.
सहस्त्रदळ ब्रह्मरंध्र ज्याचे घर ।
सत्रावी निरंतर वसे जेथे ॥
रक्त शुभ्रवर्ण नीळ पीत दिसे ।
दृष्टी शुद्ध असे तयामध्ये ॥२॥
फार किती सांगो सज्ञान तुम्ही जन ।
हा समजोन मौन्य धरा ॥३॥
गुह्याचेंही गुह्य निवृत्तिने दाविले ।
मीच वाचा हो बोले बोलतसे ॥४॥

अर्थ :
नीळ बिंदुरुप ब्रह्माचे स्थान सहस्त्रदळातील ब्रह्मरंध्र होय, त्या ठिकाणी सतरावी जी अमृत जीवनकळा असते. त्या ज्योतीचा रंग बाहेरून पाहात असता तांबडा, पांढरा, निळा, पिवळा असा दिसत असला तरी आत मात्र शुद्ध स्वरूपच आहे. तुम्ही सर्व सज्ञानच आहात तुम्हाला फार सांगावयाचे कारण नाही. वर वर्णन केलेल्या खुणांचे तात्पर्य लक्षात घेऊन मौन धारण करा. आशा तहेचे च गुह्यातील गुह्य जी ज्योत ती निवृत्तिरायांनी मला दाखविली व मी ती शब्दांनी वर्णन करून सांगितली असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग