मने मुरउनी करी राज र
351.
मने मुरउनी करी राज रया ।
प्रणवासी सखया साक्ष होई ॥१॥
देही स्थानमान विवरण करी आधी ।
पिंडीची ही शुध्दी प्रथम करी ॥२॥
औट हात हा देह ब्रम्हांड सगळे यांत ।
तयाचा निश्चित शोध करा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे विवरण करी वेगे ।
निवृत्तीच्या संगे साधिले हेचि ॥४॥
अर्थ :
मनाला मुरवुन त्याला तयार कर. मग ओंकाररूप प्रणव ध्यानाचला साक्ष बनवून. तुझ्या शरीरातील सर्व स्थानांची अगोदर शुद्धी कर. या देहाची या साडेतीन हात असलेल्या शरीरामध्ये जे अंतःकरण आहे. त्यात सर्व ब्रह्मांड उत्पन्न झालेले आहे. म्हणून अगोदर तु त्याचा शोध कर. अगोदर देहात असलेल्या आत्म्याचा शोध करावा. हे निवृतीरायांच्या संगतीमुळे शिकलो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
